नीरा भीमा कारखान्यावरती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन.
शहाजीनगर येथे 74 वा स्वातंत्र्य दिवस साजरा.

नीरा भीमा कारखान्यावरती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन.
शहाजीनगर येथे 74 वा स्वातंत्र्य दिवस साजरा.
इंदापूर:प्रतिनिधी
शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उत्साही वातावरणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आरोग्य,आर्थिक आणि सहकारातील सद्य:परस्थितीचा अभ्यासूपणे आढावा घेणारे व भविष्यकाळाचा सडेतोड वेध घेणारे मुद्देसूदपणे अतिशय प्रभावी भाषण झाले. सुमारे अर्धातास केलेले भाषणामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांना स्पर्श करीत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले. ध्वजारोहन कार्यक्रम प्रसंगी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, कृष्णाजी यादव, मनोज पाटील, प्रतापराव पाटील, दादासाहेब घोगरे, प्रकाशराव मोहिते, भागवत गोरे, मोहन गुळवे, राजेंद्र देवकर, के.एस.खाडे, एच.के. चव्हाण, पोपट तावरे, नामदेव घोगरे आदी मान्यवरांसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुभाष घोगरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.