अन् माजी मंत्री जानकर यांनी हात गाड्यावर स्वतःवडापाव तयार करून घेतला आस्वाद.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घेतला वडापावचा अस्वाद
अन् माजी मंत्री जानकर यांनी हात गाड्यावर स्वतःवडापाव तयार करून घेतला आस्वाद.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घेतला वडापावचा अस्वाद.
इंदापूर:सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे माघील काही दिवसात बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गुंठेगाव येथे त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्या येथे गेले असता तेथे लॉकडाउनमुळे अडकून पडले होते.
त्या ठिकाणी मा.मंत्री जानकर हे स्वस्थ न बसता कार्यकर्त्यांच्या शेतात जाऊन औत ओढण्यापासून शेतातील तण काढण्यापर्यतचे काम करत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता.परंतु आज दि.6 ऑगस्ट रोजी मा.मंत्री जानकर हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे काही कामानिमित्त आले असता, तेथील रस्त्यालगत असणाऱ्या वडापाव च्या गाड्यावर त्यांनी स्वतःवडापाव तळत वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला.