..अन् मामांनी काढले मरीन ड्राईव्ह वरील मुलांचे फोटो
राज्यमंत्री भरणेंचा साधेपणा कॅमेऱ्यात कैद
इंदापूर-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
दि.१४ रोजी विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आणि आमदार आशुतोष काळे मरीन ड्राईव्ह येथे फेरफटका मारत असताना काही मुलांनी राज्यमंत्री भरणे यांना न ओळखता आमच्या ग्रुपचा फोटो काढता का?म्हणून विचारणा केली असता इंदापूरच्याच न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असणाऱ्या मामांनी लगेचच त्या मुलांचा मोबाईल हातात घेऊन त्यांच्या ग्रुपचा फोटो काढला.
यावेळी राज्यमंत्री भरणे हे मुलांचा फोटो काढत असताना त्यांचा फोटो काढण्याचा मोह आमदार आशुतोष काळे यांना आवरता आला नाही आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या दत्तात्रेय भरणे यांचा साधेपणा कॅमेरात कैद केला.
या सर्व प्रकारानंतर मुलांना समझले की आपण चक्क महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सांगितले होते. त्यावेळी या युवकांनी एक फोटो आपण काढुयात अशी विनंती केली व मामा त्यांच्या आनंदात सहभागी झाले.