स्थानिक

अपंगांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : किशोर माने

बारामती मध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा

अपंगांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : किशोर माने

बारामती मध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा

बारामती वार्तापत्र 

दिव्यांग व्यक्तींनी स्वतः मध्ये न्यूडगंड न बाळगता आत्मविश्वासाने नोकरी, व्यवसाय व समाज्यातील विविध स्तरावर यश मिळवा व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आव्हान बारामती पंचायत समिती चे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी सांगितले.

जागृती अपंग विश्वस्त संस्था यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अपंग बांधवांना बारामती मध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती व ब्लॅंकेट ,खाऊ व शालेय वस्तूचे वाटप आदी कार्यक्रम चे आयोजन केले होते.या प्रसंगी किशोर माने मार्गदर्शन करत होते.

या प्रसंगी पंचायत समिती चे दिव्यांग विभागाचे अधिकारी संदीप शिंदे,सर्कल अधिकारी सुधीर बडदे, ग्राम महसूल अधिकारी किरण म्हस्के, प्रतीक ढवाणपाटील ,जागृती अपंग विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड, उपाध्यक्ष अजित शेख, कार्याध्यक्ष विनोद खरात ,सचिव संजय जाधव, उपसचिव सोडलयन तेवर, खजिनदार शेखर जाधव, व्यवस्थापक दत्तात्रय कुंभार, सदस्य अजय येडगे, स्वाती शेंडगे ,सीमा गिझरे ,सल्लागार महेंद्र गायकवाड, मार्गदर्शक अशोक जाधव व मान्यवर उपस्तीत होते.

बारामती तालुक्यातील अपंगांना पेन्शन मिळवून देणे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना चा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि नोकरी ,व्यवसाय साठी सहकार्य करणे व अपंग विद्यार्थी यांना शिक्षणासाठी मदत मिळवून देणे आदी कार्य करत असताना अपंगांनी न खचता न भिता एकत्र व संघटित राहणे गरजेचे असून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे जागृती अपंग विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी सांगितले.

कैलास शिंदे, संदीप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
आभार विनोद खरात यांनी मानले.

Back to top button