आपला जिल्हा

अयोध्येतील राम मंदिरासाठी कासुर्डीतून ७०,००० रु देणगी जमा

घरोघरी जावून स्वईच्छेने निधी गोळा करण्यात आला

अयोध्येतील राम मंदिरासाठी कासुर्डीतून ७०,००० रु देणगी जमा

घरोघरी जावून स्वईच्छेने निधी गोळा करण्यात आला.

बारामती वार्तापत्र

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाच्या होणाऱ्या अयोध्येतील राष्ट्रमंदिर-राममंदिरासाठी कासुर्डी गावातून ७०,००० रुपये देणगी लोकवर्गणीतून एकत्रित करुन आज रामसेवक हेंमतकुमार शितोळे व स्वप्निल ताम्हाणे यांच्या मार्फत SBI बँकेच्या उरुळी कांचन शाखेमार्फत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र च्या अकाऊंटला पाठविण्यात आली.

राममंदिर निधि समर्पण अभियान मार्फत कासुर्डीत घरोघरी जावून स्वईच्छेने निधी गोळा करण्यात आला. यामध्ये संयोजक कासुर्डीचे मा.सरपंच पांडुरंग आखाडे, मा.चेअरमन सोपान गायकवाड, राहुल आखाडे, मयुरआबा सोळसकर, लक्ष्मण खेनट, मा.भाजपाध्यक्ष गणेश आखाडे, उध्दव आखाडे, संतोष आखाडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय आखाडे, पिंटु आरडे, प्रविण वीर, संदिप गाढवे, विनोद वीर, चंद्रकांत आखाडे,संतोष आखाडे, संदिप आखाडे, बापू जगताप, वसंत आखाडे, अविनाश आखाडे, भारत जाधव आदि कार्येकर्ते व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन बैठक घेऊन केले होते.

समाजकार्य असो वा धार्मिक कार्य, राष्ट्रकार्य जे लोकहिताचे होणार असेल अशा कोणत्याही कार्यास झोकून देवुन असेच एकत्रितपणे संघटित समाजकार्य सुरु ठेवणार आसल्याचे मत मराठा महासंघाचे जिल्हा सचिव मयुरआबा सोळसकर यांनी सांगितले.

Back to top button