
अरविंद जगताप यांचे बारामतीत रविवारी व्याख्यान...
कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
बारामती वार्तापत्र
रसिक बारामतीकरांची अभिरुची अधिक संपन्न व्हावी, प्रतिभावंतांशी त्यांना हितगुज साधता यावे, त्यांचे विचार ऐकता यावेत या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने प्रतिबिंब व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.
याच व्याख्यानमालेअंतर्गत रविवारी (ता. 23) प्रसिध्द चित्रपट कथा व गीत लेखक अरविंद जगताप रविवारी संध्याकाळी सहा वाजता विद्यानगरीतील गदिमा सभागृहात बारामतीकरांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, गोष्ट छोटी डोंगरावढी, तू ही रे, ये रे ये रे पैसा, ठाकरे, बस्ता, येक नंबर, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा या सारख्या चित्रपटांचे लेखन, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, पत्रास कारण की, वारीत चाललो मी या सारखी सुप्रसिध्द गीते, चला हवा येऊ द्या या मालिकेतील पत्र लेखन, गोष्ट छोटी डोंगरावढी, सेल्फी, पत्रास कारण की या सारख्या प्रसिध्द पुस्तकांचे लेखक म्हणून अरविंद जगताप यांची ओळख आहे.