‘अलीकडे महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत, राज्यपालांचं नाव न घेता अजित पवारांची मोदींकडे तक्रार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं.
‘अलीकडे महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत, राज्यपालांचं नाव न घेता अजित पवारांची मोदींकडे तक्रार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं.
पुणे,प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींकडे केलेल्या राज्यपालांच्या अप्रत्यक्ष तक्रारीची… महत्त्वाच्या पदावरच्या व्यक्तींनी अनावश्यक वक्तव्य टाळली पाहिजे असं अजित पवार एमआयटी महाविद्यालयातील कार्यक्रमात म्हणाले.
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासह अनेक महामानवांचं नाव घेत केली.
अजित पवारांची तक्रार काय?
‘अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. सन्मानीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्ये केली जात आहेत. ही वक्तव्ये महाराष्ट्राला मान्य होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थान केलं. ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे न्यायाचा आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही आकस नाही, हे ही नम्रपणे नमूद करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांनी एकप्रकारे राज्यपालांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार केलीय.
पंतप्रधान मोदींकडून छत्रपतींचं नाव घेत भाषणाला सुरुवात
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अजित पवारांच्या तक्रारीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह अशा अनेक प्रतिमांसह कलाकार समाजसेवकांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या पुण्यानगरीतील माझ्या बंधू-भगिनींचा माझा नमस्कार’ अशी केली. त्याचबरोबर ‘देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. देशाच्या स्वातंत्र्यात पुण्याचं मोठं ऐतिहासिक योगदान राहिलंय. लोकमान्य टिळक, कॅपिटल बंधू, गोपाळ आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, आरती भंडारकर, महादेव गोविंद रानडे अशा अनेक स्वातंत्र्यसैनिकांना मी आदरांजली वाहतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले की, ‘बाबासाहेब पुरंदेरांचीही मी आठवण काढतोय. शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं लोकापर्ण करण्याची संधी मिळाली. आपल्या सगळ्यांच्या मनात सदासर्वदा वसणारी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा युवा पिढीत राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवते. आज पुण्याच्या विकासात जोडलेल्या अनेक प्रकल्पांचं भूमिपुजन आणि उद्घाटन झालंय. माझ्य सौभाग्य आहे की पुणे मेट्रेच्या भूमिपुजनासह लोकार्पणसाठीही मला संधी दिलीत, अशा शब्दात मोदींनी पुणेकरांचे आभार मानले.