अवकाळी पावसाचा बारामतीत बळी माळवाडी गावात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, शेळ्या पण मृत्यू
११ शेळ्यां मृत्यू झाला आहे

अवकाळी पावसाचा बारामतीत बळी माळवाडी गावात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, शेळ्या पण मृत्यू
११ शेळ्यां मृत्यू झाला आहे
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात पूर्वमोसमी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माळवाडी येथे भिंत व पत्रा शेड कोसळून नंदाबाई जनार्धन लडकत वय ६२ महिलेसोबत ११ शेळयांचा मृत्यू झाला आहे.
माळवाडी येथील या महिलेसह आणखी एक महिला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये आश्रयासाठी गेल्या होत्या. मात्र, त्याचवेळी शेडची भिंत अचानक कोसळून दोघीही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या होत्या, मात्र या दुर्घटनेत नंदाबाई लडकत यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला किरकोळ जखमी झाली आहे. या दुर्घटनेत शेडमध्ये असलेल्या ११ शेळ्यां मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
अवकाळी पाऊस, वारा यांच्यामुळे तसेच झालेल्या आपघातबाबत प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांनी अवकळी पाऊस, वारा यांच्यापासून बचाव करण्यासाठी झाडे, पत्रा शेड, खांब अथवा भिंतीचा आसरा घेऊ नये. — स्वप्नील रावडे तहसीलदार बारामती.






