इंदापूर

अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास तत्काळ भरपाई देणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

तातडीने पंचनामे करून घेण्याचा सूचना

अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास तत्काळ भरपाई देणार – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

तातडीने पंचनामे करून घेण्याचा सूचना

इंदापूर : प्रतिनिधी

राज्यामध्ये १ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.अवकाळी पावसामुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे मृत्यू झालेल्या पशुधनास तात्काळ भरपाई देणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली.

बारामती तालुक्यातील सुपा कुतवळवाडी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन मंत्री भरणेंनी पाहणी केली. भरणे म्हणाले की,राज्यभरात अवकाळीचा मोठा फटका बसला असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील सुमारे २ हजार,सातारा जिल्ह्यामध्ये २०० , नाशिकमध्ये ५१५,अहमदनगर जिल्ह्यात ७१३ आणि रायगड जिल्ह्यात २ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.तर अवकाळीचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यास बसला आहे. यामध्ये जुन्नर तालुक्यात ७५०,आंबेगाव तालुक्यात ४०३,शिरूर मध्ये ३८१,पुरंदरमध्ये १५०,मावळ ११०,खेड ९४ तसेच बारामती तालुक्यात ८८,दौंडमध्ये ४४ आणि हवेली तालुक्यात २३ असा जनावरांच्या मृत्यूचा आकडा असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून ज्या कोणाचे पंचनामे राहिले असल्यास त्यांनी तातडीने पशुसंवर्धन अधिकारी यांना नुकसानीची माहिती देऊन पंचनामे करून घेण्याच्या सूचना यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.तसेच कानाडवाडी येथे लांडग्यांच्या हल्ल्यात २४ शेळ्या मृत्युमुखी पडलेल्या घटनेची माहिती घेऊन त्याचे तात्काळ मूल्यांकन करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तसेच अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेळी-मेंढी करिता ४ हजार रुपये, गाई करिता ४० हजार रुपये, बैलासाठी ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री.मुकणे,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button