क्राईम रिपोर्ट

अवैध दारू विक्रेत्यांवर बारामती तालुका पोलीसांची कारवाई

लपून-छपून दारू विक्री सुरू

अवैध दारू विक्रेत्यांवर बारामती तालुका पोलीसांची कारवाई

लपून-छपून दारू विक्री सुरू

क्राईम; बारामती वार्तापत्र

लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत.

काल  अवैध देशी दारू विक्री करणाऱ्याविरूध्द पोलिसांनी जोरदार कारवाईची मोहिम हाती घेतली होती. पोलिसांनी विविध भागात कारवाई करीत मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक 7-4- 22 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कटफळ चौक येथे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार भोसले, पोलीस हवलदार नलवडे , कॉन्स्टेबल मुळीक , पेट्रोलिंग करत असताना एक सशंयीत कार नं MH 14 FG 4755 चेक केली असता त्यामध्ये देशी दारूचे चार बॉक्स मिळून आले पोलिसांनी सदर बाबत १) बबन उर्फ अमोल नंदु सातपुते वय २५ रा शिसुर्फळ २) भारत किसन हिवरकर वय ३३ रा शिर्सुफळ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन लाख अकरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास पोलीस हवालदार रमेश भोसले हे करीत आहेत .

Related Articles

Back to top button