इंदापूर
असंघटित कामगार व व्यावसायिकांना ई- श्रम कार्ड महत्वाचे : वसिम बागवान
शेकडो कामगारांनी केली नोंदणी

असंघटित कामगार व व्यावसायिकांना ई- श्रम कार्ड महत्वाचे : वसिम बागवान
शेकडो कामगारांनी केली नोंदणी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील प्रभाग क्रमांक ५ व्यंकटेशनगर येथे असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात आहेत.या ठिकाणी श्रमिक लेबर कार्ड मोहीम राबविण्यात आल्याने या परिसरातील असंघटित कामगार व व्यवसायिकांना खुप मदत होणार असल्याचे आयोजक वसिम बागवान यांनी सांगितले.
इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर, राजेवलीनगर, शाहुनगर, अनपट वस्ती,सातपुते वस्ती,बाब्रस मळा येथील असंघटित कामगार व व्यावसायिकांसाठी ई-श्रम कार्ड मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेमध्ये शेकडो कामगारांनी सहभागी होत ई-श्रम कार्ड साठी नोंदणी केली.
यावेळी वसिम बागवान, साजन ढावरे,विकास खिलारे,हाय्युल बागवान, ऋषिकेश उत्तेकर,अरबाज बागवान, सदाम बागवान, राजु ढावरे, कुष्णा सुर्यवंशी, इक्बाल सय्यद, असिफ सय्यद हे उपस्थित होते.