अस्मिता वेस्ट झोन खेलो इंडिया वुमेन्स पिंच्याक सिलॅट स्पर्धेमध्ये बारामतीच्या खेळाडूंची सुरवर्ण कामगिरी
देशातील विविध राज्यांनी सहभाग घेतला होता.

अस्मिता वेस्ट झोन खेलो इंडिया वुमेन्स पिंच्याक सिलॅट स्पर्धेमध्ये बारामतीच्या खेळाडूंची सुरवर्ण कामगिरी
देशातील विविध राज्यांनी सहभाग घेतला होता.
बारामती वार्तापत्र
गोवा येथे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया व इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन यांच्या मान्यतेने, पिंच्याक सिलॅट असोसिएशन ऑफ गोवा ने आयोजित केलेल्या अस्मिता वेस्ट झोन खेलो इंडिया वुमेन्स पिंच्याक सिलॅट लीग क्रीडा स्पर्धा मध्ये योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक यश मिळवत पथकांची कमाई केली व रोख रक्कम सुद्धा बँक खात्यात जमा झाली.
देशातील विविध राज्यांनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र संघातील ८१ महिला खेळाडूंची निवड झाली होती. यामध्ये बारामतीच्या २० महिला खेळाडूंनी यश मिळवले. बारामती येथील योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीला क्रीडा प्रशिक्षक साहेबराव ओहोळ यांच्या मारगदर्शनाखाली सराव केला होता केली होती.महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत खेलो इंडिया वुमन लीग मध्ये महाराष्ट्र संघाने चॅम्पियनशिप चषक पटकावून अव्वल स्थान अबाधित ठेवले. तसेच सर्व विजेत्या खेळाडूंना थेट त्यांच्या बँक अकाउंट वर स्पोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया (साई) च्या मार्फत बक्षिस रक्कम वर्ग करण्यात आली.
मेडिलिस्ट खेळाडू पुलप्रमाणे गोल्ड मेडल :-यशश्री माने तीन गोल्ड,रेग्यु टीम गोल्ड मेडल :-१)वैष्णवी गुळवे, आर्या बोडरे, श्रेया गरजे,२)प्रियश्री शितोळे, आदिश्री शितोळे, आराध्या शितोळे
फाईट मध्ये गोल्ड मेडल :-प्रज्ञा बनसोडे,
रेग्यु टीम सिल्वर मेडल :-राजनंदिनी पालवे, आर्या लिमकर, संयोगिता यादव
ब्रॉन्झ मेडल :- स्नेहल झिरपे, अथश्री माने, ख़ुशी शर्मा ब्रॉन्झ मेडल,
सहभागी खेळाडू :-अनुष्का सोलनकर, परी रुपणावर, स्नेहल झोले, लावण्या उमाप, निधी पतंगे
खेळाडू च्या हितासाठी कटिबद्ध असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे साहेबराव ओहोळ यांनी सांगितले.