निवडणुकांच्या तोंडावर करुणा-धनंजय मुंडेंची प्रेमकहाणी मराठीत येणार; अनेक बायकाही लपवल्या’, नव्या आरोपांमुळे राजकीय खळबळ

धनंजय मुंडे यांच्याविरोधातही निवडणूक लढवण्याचा इशारा

निवडणुकांच्या तोंडावर करुणा-धनंजय मुंडेंची प्रेमकहाणी मराठीत येणार; अनेक बायकाही लपवल्या’, नव्या आरोपांमुळे राजकीय खळबळ

धनंजय मुंडे यांच्याविरोधातही निवडणूक लढवण्याचा इशारा

कोल्हापूरःप्रतिनिधी

राज्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधीच आता राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, या निवडणुकांच्या तोंडावर करुणा शर्मा-मुंडे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा करताच धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची प्रेमकहाणी  लवकरच मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत, असा हल्लाबोल करुणा शर्मा यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना केला. करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केलीय.

करुणा शर्मा म्हणाल्या की, मला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आशिर्वाद आहे. कोल्हापूरची जनता मला विधानसभेत पाठवेल असं त्या म्हणाल्या. घराणेशाहीचं राजकारण संपवून कोल्हापूरचा विकास करणं हाच माझा उद्देश आहे, असं त्या म्हणाल्या.

आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या नावबाबत तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

याबाबत त्यांना विचारणा केली असता, ‘माझ्याकडे सर्व कायदेशीर पुरावे आहे. उलट धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक पत्नी लपवल्या आहे. करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना आता अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे सर्व कायदेशीर पुरावे आहेत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही,  असा खुलासाच करुणा मुंडे यांनी केला.

कोण आहेत करुणा शर्मा?

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर धनंज मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे त्यांनी म्हटलं होते. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचे मान्य केले होते. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचे त्यांनी कबूल केलेले नाही.

Related Articles

Back to top button