इंदापूर नगरपरिषद नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी येणार एकाच मंचावर
कोण काय बोलणार याची लागली उत्सुकता

इंदापूर नगरपरिषद नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी येणार एकाच मंचावर
कोण काय बोलणार याची लागली उत्सुकता
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामांच्या श्रेयवादावरून आरोप-प्रत्यारोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.१२) इंदापूर नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन व कोनशिला अनावरण समारंभाच्या निमित्ताने कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एकाच मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
इंदापूर नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शनिवारी (दि.१२) सकाळी साडे अकरा वाजता ज्येष्ठ समाजसेवक आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष गोकुळदास विठ्ठलदास शहा व ज्येष्ठ कवियत्री प्रतिभा प्रभाकर गारटकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा असणार आहेत.