अहमनदनगर जिल्हा रुग्णालयात आग प्रकरणात टीका झाल्यानंतर आता राज्य सरकारने मोठी कारवाई, 4 अधिकारी निलंबित, दोघांच्या सेवा समाप्त
ठाकरे सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ पाच लाखांची मदत जाहीर
अहमनदनगर जिल्हा रुग्णालयात आग प्रकरणात टीका झाल्यानंतर आता राज्य सरकारने मोठी कारवाई, 4 अधिकारी निलंबित, दोघांच्या सेवा समाप्त
ठाकरे सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ पाच लाखांची मदत जाहीर
प्रतिनिधी
अहमनदनगर जिल्हा रुग्णालयात आग प्रकरणात टीका झाल्यानंतर आता राज्य सरकारने मोठी कारवाई केलीय. या प्रकरणाशी संबंधित चार अधिकाऱ्यांना निलंबित तर दोन कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आलीय. यामध्ये स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांचा समावेश आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिलीय.
ठाकरे सरकारवर राज्यभरातून टीका, आता निलंबनाची कारवाई
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात 7 नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या भीषण आगीत एकून अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर अनेकांची प्रकृती खालावली होती. या दुर्घटनेत अकरा जणांनी प्राण गमावल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. राज्य सरकारला लक्ष्य केले जाऊ लागले. पतंप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाहा यांनादेखील या घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं होतं. मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यामुळे ठाकरे सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ पाच लाखांची मदत जाहीर केली होती. तसेच दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वसन देण्यात आले होते. त्यानंतर आता रुग्णालयातील चार अधिकारी तसेच दोन कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आलीय.
कोणकोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई ?
1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित
2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित
3. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित
4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित
5. आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त
6. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त