स्थानिक

आईसह बाळाचा विहिरीत आढळला मृतदेह

डगाव निंबाळकर येथे ही घटना उघडकीस आली.

आईसह बाळाचा विहिरीत आढळला मृतदेह

डगाव निंबाळकर येथे ही घटना उघडकीस आली.
बारामती वार्तापत्र

विवाहित महिलेसह तिच्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. बारामती तालुक्यात वडगाव निंबाळकर येथे ही घटना उघडकीस आली.
सुषमा प्रमोद लोणकर (वय,२६), वीर प्रमोद लोणकर (वय.९ महिने) अशी मृतांची नावे आहेत. मृत सुषमा यांचे घरातील प्रापंचिक कारणावरुन भांडण झाले होते. ती घरातून निघुन जात असताना तीला भावकीतील सतीश राजेंद्र लोणकर यांनी तिला त्यांच्या घरी नेले.व घरी झोपवले होते. माञ पहाटे सुषमा व लहान मुलगा घरात न दिसल्यास त्यांचा आजूबाजूस शोध घेत असताना येथील चिलाई मंदिरा शेजारी विहिरीत लहान मुलासह सुषमा यांचे प्रेत आढळून आले. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार शेंडगे करित आहेत.

Back to top button