पुणे

राज्यात मशिदीवरील भोंग्यावरुन वाद सुरु असताना गृहमंत्र्यांचा दिलीप वळसे पाटील यांनी एक जातीय समानतेचा संदेश

कोणत्याही धर्माचा आदर करणे ही ही माझी पद्धत आहे. 

राज्यात मशिदीवरील भोंग्यावरुन वाद सुरु असताना गृहमंत्र्यांचा दिलीप वळसे पाटील यांनी एक जातीय समानतेचा संदेश

कोणत्याही धर्माचा आदर करणे ही ही माझी पद्धत आहे.

शिरुर, पुणे : प्रतिनिधी

राज्यात मशिदींवरील सुरु असलेल्या वादामुळे जातीय तेड निर्माण होत असताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक जातीय समानतेचा संदेश दिला आहे. शिरुर तालुक्यातील मलठण येथील जाहीर कार्यक्रमादरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी एक जातीय संदेश दिला आहे. शिरुर तालुक्यातील मलठण येथील जाहीर कार्यक्रमादरम्यान दिलीप वळसे पाटलांचे भाषण सुरु असताना याचवेळी मशिदीवर आजान सुरु झाली आणि त्यांनी भाषण थांबवले.

याबाबत त्यांंना विचारले असता ते म्हणाले की, कोणत्याही धर्माचा आदर करणे ही ही माझी पद्धत आहे. पण सध्यादेशाच्या विकासावर बोलायचे सोडून मशिदीवरींल अजानला विरोध केला जातो. हनुमान चालिसावर बोलायचे आणि धर्माधर्मात वाद निर्माण करून राजकारण अस्थिर करण्याचे काम सध्या राज्यात सुरू आहे. यामुळे राजकारण अस्थिर होणार नाही, पण देश खिळखिळा होवून देशाचे तुकडे यातून पडू शकतात, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.

.

 

Back to top button