आखेर पाचव्या दिवशी लेखी आश्वासनानंतर जोशी समाजाचे ठिय्या आंदोलन स्थगित…
आंदोलनास चौथ्या दिवशी भेट दिली
आखेर पाचव्या दिवशी लेखी आश्वासनानंतर जोशी समाजाचे ठिय्या आंदोलन स्थगित…
आंदोलनास चौथ्या दिवशी भेट दिली
बारामती वार्तापत्र
जोशी समाजाच्या वतीने वनविभाग बारामती यांच्या समोर गाव मौजे कन्हेरी येथील गट नं 293 मधील 2 हेक्टर जमीनीचा अनाधिकृत ताबा घेतला होता, त्या संदर्भात ठिय्या चालु होते, त्या मधे किशोर मासाळ ,व डॉ नवनाथ मलगुंडे यांनी मध्यस्थी करून मा.तहसिलदार साहेब व वन विभाग बारामतीचे प्रमुख शुभांगी लोणकर यांच्या शी चर्चा करून दोघांनी आंदोलनास चौथ्या दिवशी भेट दिली व अखेर पाचव्या दिवशी लेखी आश्वासन दिले की, वरिष्ठांशी चर्चा करून या मधे काय मार्ग काढण्याच्या प्रयत्न करू तो पर्यत आंदोलन मागे घ्या, त्या वेळेस अँड अमोल सातकर यांनी आंदोलनास स्थगिती देऊ आपण आपल्या वरिष्ठ आधीकरयाशी चर्चा करून मार्ग काढा अन्यथा पुन्हा आम्ही या पेक्षा वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करू आसे सांगीतले.
या वेळी शुभम मोरे किशोर पाचंगे व मोठ्या प्रमाणावर समाज बांधव व महीला या मधे जळोची, वाई मेडद ,सातारा कोल्हापूर या ठिकाणा वरून पाच दिवस समाज बांधव उपस्थित रहात होते….