आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक संपन्न
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले मार्गदर्शन
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2021/10/cd215402-dd7e-41b5-9bc9-a06cbba74359-780x470.jpg)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक संपन्न
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले मार्गदर्शन
इंदापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध सेलच्या तालुकाध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह
इंदापूर येथे रविवारी ( दि.३ ) पार पडली.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सखोल मार्गदर्शन केले.
इंदापूर तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणूकांमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुर्ण ताकदीने उतरणार असून सर्वच निवडणूकांमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन करणार असल्याचा विश्वास यावेळी बोलताना गारटकर यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना गारटकर म्हणाले की, सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सत्तेत असून उपमुख्यमंत्री अजित पवार,दत्तात्रय भरणे हे राज्य मंत्रिमंडळामध्ये कार्यक्षममंत्री म्हणून काम करत आहेत, त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या माध्यमातून होत असलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सर्व तालुकाध्यक्षांनी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रात्र-दिवस मेहनत घेत आहेत,त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे इंदापूर तालुक्यामध्ये खेचून आणली जात आहेत त्यामुळे विकासकामांच्या बाबतीमध्ये इंदापूर तालुका अग्रेसर राहण्यासाठी आपले नेतेमंडळी प्रयत्न करत असताना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपणही याची प्रसिद्धी जनमानसामध्ये करणे आवश्यक असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.
कोरोना महामारीच्या काळामुळे आपल्याला संघटनात्मक बांधणी करताना थोड्याबहुत प्रमाणावर अडचणी आल्या परंतु आत्ता मात्र आपापल्या सेलचा विस्तार अजून व्यापक होण्याच्या दृष्टीने सर्वच रेंटल सेलच्या तालुकाध्यक्षांनी जोमाने कामास सुरुवात करण्याचे आदेशही यावेळी जिल्हाध्यक्षांनी सर्व फ्रंटल सेलच्या तालुकाध्यक्षांना दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटील,कार्याध्यक्ष अतुल झगडे,पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे, महिला अध्यक्षा छाया पडसळकर, युवक तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर,कार्याध्यक्ष सचिन खामगळ, पदवीधर सेलचे रमेश पाटील,सहकार सेलचे साहेबराव चोपडे,किसान सेलचे देविदास निंबाळकर, उद्योग व व्यापार सेलचे विनोद कारंडे,ओबीसी सेलचे तुकाराम करे, भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलचे अण्णासाहेब धोत्रे,सामाजिक न्याय विभागाचे शितलचंद्र कांबळे, अल्पसंख्यांक सेलचे इक्बाल शेख,सेवादलाचे दत्तात्रेय मोरे,कला साहित्य व चित्रपट सेलचे सचिन रणपिसे,डॉक्टर सेलचे डॉ.अमोल खानावरे,अपंग सेलचे दत्ता बाबर,युवती अध्यक्षा अश्विनी कुर्डे,सोशल मीडियाचे हामा पाटील,शिक्षक सेलचे सुनील मोहिते आदी तालुकाध्यक्ष उपस्थित होते.