आगीत अडकलेल्या कुटुंबांला अग्निशमन दलाने काढले सुखरूप बाहेर
आगीमुळे इमारतीचे मोठे नुकसान
बारामती वार्तापत्र
बारामतीत तांदूळवाडी रोड येथील गुरूकृपा काँलनी जिजामाता नगर या ठिकाणी डॉ.भगवान शंकर माळी यांच्या दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग लागली होती. व दुसर्या मजल्यावर कुटूंब अडकले होते. ही घटना आज पहाटे 4:30 दम्यान घडली होती. सदर माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहोचून आग विझवून आगीत अडकलेल्या कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश मिळाल आहे.
पहाटेच्या सुमारास जॉगिंगला जात असताना इमारतीला आग लागल्याचे काही नागरीकांच्या निदर्शनास आले. दम्यान इमारतीला आग लागलेली पाहताच तेथील नागरिकांनी त्वरीत 101 डायल करून आग लागलेली महिती कळविली. माहिती मिळताच बारामती नगर परिषद चे अग्निशमन दल काही मिंटातच घटनास्थळी येऊन तेथील लागलेली आग विझवून दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढले आहे. लागलेल्या आगीत कोणत्याही प्रकारे जीवित हानी झाली नाही. मात्र इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
इमारतीला लागलेली आग पाहून जॉगिंगला जाणाऱ्या नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाने अवघ्या काही क्षणातच घटनास्थळी येऊन इमारतीला लागलेली आग विझवून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. हे काम अगदी जलद गतीने केल्यामुळे तसेच आगीत अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवल्याबद्दल येथील स्थानिक नागरिकांनी बारामती नगर परिषद, अग्निशमनदलाचे आभार व्यक्त केले आहे.
या प्रसंगी बारामती नगर परिषद अग्निशमन दलाचे जवान चालक निवृत्ती जाधव,फायरमन उमेश लालबिगे, फायरमन निखिल कागडा, चालक राजेन्द्र मिरगुंडे, फायरमन प्रदिप लालबिगे, फायरमन मोहन शिंदे यांनी अग्निशमन बंब ने आग विझवून नागरिकांचे प्राण वाचवले आहेत.