आजपासून कोरोना निर्बंध शिथील ? काय बंद ? काय सुरु?
50 टक्के क्षमतेनं हॉटेल, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु असतील. तर, लसीचे दोन डोस न घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

आजपासून कोरोना निर्बंध शिथील ? काय बंद ? काय सुरु?
50 टक्के क्षमतेनं हॉटेल, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु असतील. तर, लसीचे दोन डोस न घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
आजपासून कोरोना निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. 50 टक्के क्षमतेनं हॉटेल, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु असतील. तर, लसीचे दोन डोस न घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही. जीम सलून 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. खासगी कार्यालय 24 तासापर्यंत सुरु राहणार आहेत. लग्न सोहळ्यात बंदिस्त हॉलमध्ये 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलीय. तर, खुल्या लॉनमध्ये उपस्थितीची मर्यादा 200 पर्यंत वाढवण्यात आलीय.मुंबई लोकलमध्ये दोन डोस घेतल्यानंतर 14 दिवस उलटलेल्यांना प्रवास करता येणार आहे. आजपासून हे नवे नियम लागू होत आहेत. राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद राहणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त संवाद साधताना ज्यावेळी राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागेल तेव्हापासून लॉकडाऊन लावावं लागेल, असा इशारा दिला आहे.