आजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल
सध्या वाहन चालवताना मोबाईल दूरध्वनीचा वापर करण्याची परवानगी नाही.

आजपासून नियम बदलले; आता गाडी चालवताना लायसन्स सोबत नसेल तरीही चालेल
सध्या वाहन चालवताना मोबाईल दूरध्वनीचा वापर करण्याची परवानगी नाही.
बारामती वार्तापत्र
नागरिकांचे व्यवहार सुरळित आणि पेपरलेस व्हावेत यासाठी आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार वाहन चालवताना लायसन्स बाळगण्याऐवजी त्याची इ-कॉपी दाखवली तरी चालेल. तसेच फक्त रस्ता शोधण्यासाठी मोबाईल दूरध्वनीचा वापर करता येईल.
मोटारीत मोबाईल, पण…
वाहनचालक परवाना तसेच आरसी-बुक सारखी कागदपत्रे आता मोटारीत ठेवण्याची गरज नाही.
ही कागदपत्रे केंद्राच्या डिजीलॉकर किंवा एम परिवर्तन सारख्या ऑनलाईन पोर्टलवर ठेऊन ती ऑनलाईन कॉपी वाहन चालवताना बाळगली तरीही चालेल. सध्या वाहन चालवताना मोबाईल दूरध्वनीचा वापर करण्याची परवानगी नाही. मात्र आता रस्ते शोधण्यासाठी मोबाईल वापरता येतील, अर्थात त्यामुळे वाहनचालकाची एकाग्रता भंग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यासंदर्भात केंद्राने वाहन कायद्यात बदल केले आहेत.