आज इंदापूर तालुक्यातील ही 20 जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.
इंदापूर तालुक्यात 28 नमुन्यांपैकी 20 जण कोरोना बाधित.
आज इंदापूर तालुक्यातील ही 20 जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यात 28 नमुन्यांपैकी 20 जण कोरोना बाधित आढळली असून त्यामध्ये उद्धट येथील पाच जणांचा समावेश आहे. यामध्ये 23 वर्षीय युवती, तीस वर्षीय महिला, 63 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला व चार वर्षीय मुलीचा समावेश आहे. वडापुरी येथे 30 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. लाखेवाडी येथे एकाच कुटुंबातील पाच जण कोरोना बाधित आढळले असून, यामध्ये 38 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगा, 55 वर्षीय महिला व 31 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
निरवांगी येथे चाळीस वर्षीय पुरुष रुग्ण आढळला असून वालचंदनगर येथे तीन जण कोरोना बाधित आढळले आहेत, यामध्ये 24 वर्षे पुरुष, 24 वर्षीय महिला व 59 वर्षीय महिलेचा समावेश आहे. शेळगाव येथे ही एक रुग्ण आढळला असून त्यामध्ये 22 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. रेडणी येथे दोन कोरोना बाधित आढळले असून 45 वर्षीय महिला व 24 वर्षीय महिलेचा समावेश आहे. भिगवण येथे एक जण आढळला असून हा पन्नास वर्षे पुरूष रूग्ण आहे तर डिकसळ येथे 72 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची बाधा झाली आहे.