इंदापूर
आज इंदापूर तालुक्यात शेतकरी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक पाणीप्रश्नी कृती समितीच्या मागणीसाठी १० गावांत रास्तारोको
इंदापूर तालुका शेतकरी कृती समिती तत्काळ स्थापन करून या समितीमार्फत तालुक्याला पुन्हा पाच टीएमसी पाणी मिळावे म्हणून गेले दोन दिवसा पासून सातत्याने रास्तारोको निषेध आंदोलने सुरू आहेत.

बारामती वार्तापत्र
उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला मंजूर झालेले पाच टीएमसी पाणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रद्द केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील शेतकरी, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत. इंदापूर तालुका शेतकरी कृती समिती तत्काळ स्थापन करून या समितीमार्फत तालुक्याला पुन्हा पाच टीएमसी पाणी मिळावे म्हणून गेले दोन दिवसा पासून सातत्याने रास्तारोको निषेध आंदोलने सुरू आहेत.
आज इंदापूर तालुक्यात शेतकरी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले असून आजही इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या 10 गावांमध्ये रस्तारोको आंदोलन हे एकाच वेळी सुरू झाल्याने उजनीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चिघळला आहे. शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे.