आज इंदापूर तालुक्यात ३१ कोरोनाबाधित.
इंदापूर तालुक्यात एका आठवड्यात १७ गावांमध्ये रॅपीड अॅंटीजेनचे कॅम्प आयोजित करून तब्बल ९१ हजार २३१ लोकांची तपासणी करण्यात आली.
आज इंदापूर तालुक्यात ३१ कोरोनाबाधित.
इंदापूर : बारामती वार्तापत्र
आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये रेडणी येथील ६५ वर्षीय महिला, लासुर्णे येथील ३२ वर्षीय पुरूष, न्हावी येथील ३० वर्षीय महिला, तरटगाव येथील ४२ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महिला, वरकुटे येथील ३१ वर्षीय महिला, पळसदेव येथील ४५ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरूष, कौठळी येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश यामध्ये आहे.
माळवाडी नंबर २ येथे एकाच कुटुंबातील ६ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये येथील ६० वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महिला, ३८ वर्षीय महिला, १८ वर्षीय युवती, १२ वर्षीय मुलगा, १० वर्षीय मुलाचा समावेश आहे.
वडापुरी येथील ५२ वर्षीय पुरूष, इंदापूर येथील ५४ वर्षीय पुरूष, नरसिंहपूर येथील ४० वर्षीय पुरूष, ३० वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगा, डाळज नंबर २ येथील १६ वर्षीय मुलगा, इंदापूर येथील ७८ वर्षीय महिला, अंथुर्णे येथील ३६ वर्षीय पुरूष रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.
अशोकनगर येथील ३७ वर्षीय महिला, भांडगाव येथील ४४ वर्षीय पुरूष, सणसर येथील ५२ वर्षीय पुरूष, भांडगाव येथील ४४ व्रषीय पुरूष, निमगाव केतकी येथील ३६ वर्षीय महिला, जंक्शन येथील ६ महिन्याचा मुलगा, गोतंडी येथील ३५ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.
इंदापूर तालुक्यात एका आठवड्यात १७ गावांमध्ये रॅपीड अॅंटीजेनचे कॅम्प आयोजित करून तब्बल ९१ हजार २३१ लोकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून ७७० संशयित आढळले, त्यातून १४४ जण कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे कोरोनाचे जे रुग्ण मध्यंतरी वाढले होते, त्यामध्ये घट आली आहे.