शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणाला नवे वळण,आंदोलक सिल्व्हर ओक जाणार ची माहिती पोलिसांना अर्धा तास आधी होती, FIR कॉपीत धक्कादायक खुलासे
सदावर्ते यांच्या भाषणाच्या काही क्लिप पोलिसांना मिळाल्या आहेत.

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणाला नवे वळण,आंदोलक सिल्व्हर ओक जाणार ची माहिती पोलिसांना अर्धा तास आधी होती, FIR कॉपीत धक्कादायक खुलासे
सदावर्ते यांच्या भाषणाच्या काही क्लिप पोलिसांना मिळाल्या आहेत.
मुंबई,प्रतिनिधी
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी घुसून आंदोलन केलं होतं. याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे.
या FIR ची कॉपी बारामती वार्तापत्र च्या हाती लागली आहे. यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. आंदोलकांनी मद्यप्राशन केल्याचं FIR मध्ये नमुद करण्यात आलं आहे.
एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या घरी दुपारी ३ वाजताच पोहोचणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती पण पोलीस वेळेवर पोहोचू शकले नाही, असं पोलीस एफआयआरमध्ये उघड झालं आहे.
पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण मिळालं. कथित एसटी कर्मचाऱ्यांनी राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी धुडगूस घातला होता.
७ एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांनी दिले होते चिथावणीखोर भाषण करून इशारा दिला होता. तसंच प्रसार माध्यमांशी बोलत असताना “शरद पवारांच्या निवास स्थानी घुसून त्यांना जाब विचारणार” असा इशारा गुणरत्न सदावर्तेंनी दिला होता.
या प्रतिक्रियेला प्रेरीत होवून आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला होता. दुपारी ३ वाजताच पोलिसांना माहिती मिळाली होती. आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार असल्याची माहिती पोलिसांना अर्धा तास आधी मिळाली होती. तरी देखील पोलीस वेळेवर पोहचू शकले नाही. सदावर्ते यांच्या चिथावणीखोर भाषणामुळेच आंदोलक सिल्व्हर ओकवर पोहोचले होते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ तारखेला आझाद मैदानावर रात्री बैठक झाली होती. त्या बैठकीत बारामती आणि सिल्व्हर ओक येथे जाण्याबाबत चर्चा झाली होती. याकरता काही जणांवर जबाबदारी देखील दिली गेली होती. या मुद्दांचा आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक म्हणजे, ८ तारखेला दुपारी ३ वाजता आंदोलक सिल्व्हर ओक येथे जाणार आहेत हे पोलिसांना कळाले होते. पण ७ तारखेला गुणरत्न सदावर्ते यांनी भाषणात सिल्व्हर ओक येथे जाण्याचा उल्लेख केला होता. तेव्हाच आझाद मैदान येथे जे पोलिस उपस्थित होते त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली होती तरी देखील शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला गेला नाही.