कोरोंना विशेष

आज कोरोणाची संख्या 18 वर पोहोचली,, रुग्ण संख्या वाढतेय काळजी घ्या !

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली

आज कोरोणाची संख्या 18 वर पोहोचली,, रुग्ण संख्या वाढतेय काळजी घ्या !

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली

बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना ची एकूण रुग्ण संख्या 18 झाली आहे.

शासकीय rt-pcr 200 नमुन्यामधून 9 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 26 rt-pcr रुग्णांपैकी 9 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 9 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह नाही.
शहरातील 8 तर ग्रामीण भागातील 10 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात 2 ने रुग्णसंख्या जास्त आहे.

बारामती तालुक्यात काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पणदरे येथील 35 वर्षीय पुरुष जळोची येथील 31 वर्षीय महिला 30 वर्षीय पुरुष संभाजीनगर येथील 38 वर्षीय महिला उत्कर्ष नगर येथील 51 वर्षीय पुरुष सोनगाव येथील 28 वर्षीय महिला सोनवडी सुपे येथील 25 वर्षीय पुरुष चोपडा येथील तीस वर्षीय पुरुष तांबे नगर येथील 26 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

बारामती तालुक्यात काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती शहरातील 42 वर्षीय पुरुष, मधुमालती अपार्टमेंट येथील 85 वर्षीय महिला, खराडेवाडी येथील 36 वर्षीय महिला, पिंपळी येथील 27 वर्षीय महिला, येथील तीस वर्षीय महिला, पिंपळी लिमटेक येथील 65 वर्षीय पुरुष, मोरगाव गणपती मंदिराशेजारील 52 वर्षीय महिला, सुपे येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 6158आहे तर बरे झालेले रुग्ण 5894 व एकूण मृत्यु 142 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram