कोरोंना विशेष

आज दुपारी २ पर्यंत तीन कोरोना बाधित.

नव्याने एका रुग्णाची भर

आज दुपारी २ पर्यंत तीन कोरोना बाधित.

नव्याने एका रुग्णाची भर

बारामती : वार्तापत्र 

आज सकाळी बारामतीत दोन जणांना कोरोना झाल्याचा अहवाल आल्यानंतर आता ६९ नमुन्यांपैकी उर्वरित १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र आणखी एका महिलेला कोरोना नव्याने आढळला आहे. त्यामुळे दिवसभरात दुपारपर्यंत तीन जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

दरम्यान असून एक अहवाल प्रतीक्षेत आहे. ६९ पैकी ६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही एक दिलासादायक बाब आहे. दरम्यान आढळलेल्या दोन कोरोनाबाधितांमध्ये शहरातील वडूजकर इस्टेट श्रीराम नगर भिगवण रोड येथील एक ६२ वर्षाची महिला समाविष्ठ असून तिचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आलेला आहे. दुपारपर्यंत तीन रुग्ण बारामती शहरांमध्ये पॉझिटिव्ह आलेले असून बारामती तालुक्याची आजवरची रुग्णसंख्या ११४ झालेली आहे.

अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ. मनोज खोमणे यांनी दिली 

Back to top button