आज पुन्हा इंधनाचे दर कडाडले; पेट्रोल 122.62, तर डिझेल 105.21 रुपये लिटर, इतर शहरांतील दर काय?
जाणून घेऊयात या शहरांमध्ये एक लिटर पेट्रोल-डिझेलच्या किमती कितीनं महागल्या आहेत.
आज पुन्हा इंधनाचे दर कडाडले; पेट्रोल 122.62, तर डिझेल 105.21 रुपये लिटर, इतर शहरांतील दर काय?
जाणून घेऊयात या शहरांमध्ये एक लिटर पेट्रोल-डिझेलच्या किमती कितीनं महागल्या आहेत.
नवी दिल्लीः प्रतिनिधी
गेल्या २२ मार्चपासून सुरू असलेली इंधन दरवाढ कायम असून, आज मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दरात वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा इंधन दरात वाढ केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत इंधनाच्या दरात वाढ होण्याची ही १३ वी वेळ आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळं सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक भार सोसावा लागत आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळं त्याचा परिणाम इतर गोष्टींवरही होत आहे.
आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती?
देशातील सर्व राज्यांप्रमाणेच आज महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही सर्वात महाग पेट्रोल परभणीत विकलं जात आहे. आजच्या दरवाढीनंतर परभणीत एक लिटर पेट्रोलचे दर 122.01 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 104.62 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.
मुंबई शहरात आज पेट्रोलचा दर 84 पैशांनी वाढून 119.67 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 85 पैशांनी वाढून 103.92 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर पुण्यात आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 119.07 रुपये तर डिझेलचा दर 101.78 रुपयांवर पोहोचला आहे. नाशिकमध्ये आज पेट्रोलचा दर 119.11 रुपये तर डिझेलचा दर 101.83 रुपये प्रति लिटर झाला आहे. नागपुरात आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 119.33 रुपये तर डिझेलचा दर 102.07 रुपये प्रति लिटर झाला आहे. कोल्हापुरात आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 119.69 रुपये तर डिझेलचा दर 102.41 रुपयांवर पोहोचला आहे.
शहरं | पेट्रोलचे दर (प्रति लिटर) | डिझेलचे दर (प्रति लिटर) |
मुंबई | 119.67 रुपये | 103.92 रुपये |
पुणे | 119.07 रुपये | 101.78 रुपये |
नाशिक | 119.11 रुपये | 101.83 रुपये |
परभणी | 122.01 रुपये | 104.62 रुपये |
औरंगाबाद | 119.97 रुपये | 102.65 रुपये |
कोल्हापूर | 119.69 रुपये | 102.41 रुपये |
नागपूर | 119.33 रुपये | 102.07 रुपये |