आज बारामतीत नव्याने बारा जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 308 झाली आहे.
आज बारामतीत नव्याने बारा जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
आज दुपारपर्यंत बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 308 झाली आहे.
ग्रामीण रुग्णालय रूई येथे एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे त्यामुळे बारामतीतील मृत्यूची संख्या 21 झालेले आहे.
बारामती : वार्तापत्र
बारामतीत नव्याने बारा जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दुपारपर्यंत आलेल्या अहवालात आज सकाळपासून बारा जण आढळले असून बारामती आज दुपारपर्यंत बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 308 झाली आहे.
बारामती मध्ये काल घेतलेल्या 74 नमुन्यांमध्ये सीबीनॅट तपासणीत तीन जण कोरोना बाधित आढळून आले असून आरटीपीसीआर तपासणीत नऊ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
या केलेल्या तपासणीत शासकीय अहवालात नमूद करण्यात आलेल्या पत्त्यानुसार तांबेनगर येथील 21 वर्षीय युवक, तांदूळवाडी येथील 25 वर्षीय युवक, पाहुणेवाडी येथील तीस वर्षीय महिला, मूर्टी येथील 45 वर्षीय महिला, जळोची येथील 23 वर्षीय युवक, पणदरे येथील 53 वर्षे पुरुष, बारामती शहरातील 22 वर्षीय युवक व 45 वर्षीय पुरुष, एमआयडीसीमधील 37 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी येथील 53 वर्षीय महिला, शारदा नगर येथील 84 वर्षीय पुरुष व भोई गल्ली येथील 18 वर्षीय पुरुष आदींचा समावेश आहे.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली .