आज बारामतीत 67 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह.
३५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
बारामती वार्तापत्र
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारामतीतील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
परिणामी बारामतीतील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही आता पाचशेच्या पार गेली आहे.त्यामुळे बारामतीवरील कोरोनाचे सावट हे अधिकाधिक गडद होताना दिसत आहे.
काल बारामतीमध्ये एकूण १०२ कोरोना संशयितांच्यघशातील स्त्रवाचे नमुने RT-PCR तपासणीसाठी घेण्यात आले होते.
त्यापैकी ६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेे असून उर्वरित ३५ जणांचा अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ. मनोज खोमणेे यांनी दिली.