स्थानिक

आणखी एक मानाचा तुरा,25 एसटी बसस्थानके स्वच्छताअभियानात उत्तीर्ण;बारामतीने पटकावला पहिला क्रमांक

इंदापूर बसस्थानकाने दुसरा क्रमांक वर

आणखी एक मानाचा तुरा,25 एसटी बसस्थानके स्वच्छताअभियानात उत्तीर्ण;बारामतीने पटकावला पहिला क्रमांक

इंदापूर बसस्थानकाने दुसरा क्रमांक वर

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर एसटी बसस्थानक’ अभियानात पुणे विभागाने सहभाग घेतला. यात पुणे विभागातील ३१ पैकी २५ बस स्थानके उत्तीर्ण झाली. बारामती आणि इंदापूर बस स्थानकांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळवला. स्वारगेट बस स्थानकाला साधारण गुण मिळाले.

बसस्थानकांचे वर्गीकरण आणि गुणपद्धती

एसटी महामंडळाने बसस्थानकांच्या भौगोलिक स्थानानुसार ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ असे तीन गट केले आहेत. प्रत्येक बसस्थानकाचे 100 गुणांवर मूल्यांकन केले जाते. दरम्यान, 70 ते 100 गुण म्हणजे ‘उत्कृष्ट’, 50 ते 70 गुण म्हणजे ‘मध्यम’, आणि 0 ते 50 गुण म्हणजे ‘वाईट’ असे वर्गीकरण केले जाते.

  • प्रसाधनगृहाची स्वच्छता:30 गुण
  • बसस्थानक व्यवस्थापन:50 गुण
  • हरित बसस्थानक (परिसरातील हिरवळ):20 गुण

यासाठी सरकार नियुक्त समिती बसस्थानक परिसर, शौचालये, एकूण स्वच्छता, रोजची प्रवासी संख्या आणि बसच्या देखभालीची पाहणी करते. या गुणांवरून श्रेणी ठरवली जाते. एकूण सहा फेऱ्यांमधील गुणांच्या आधारे अंतिम विजेत्या बसस्थानकाची निवड होते आणि त्यांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येते. दरम्यान, यंदाच्या निकालावरून पुणे विभागातील बसस्थानकांच्या स्वच्छतेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसत आहे. एसटी महामंडळाने गेल्या दोन वर्षांपासून हे अभियान सुरू केले आहे. बसस्थानकांमध्ये स्वच्छता आणि सौंदर्यास प्रोत्साहन देणे हा या अभियाना मागील उद्देश आहे.

Related Articles

Back to top button