कोरोंना विशेष

आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना चा उच्चांक दौंडला.

 एका दिवसात शहरासह तालुक्यात 43 कोरोनाचे रुग्ण.

आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना चा उच्चांक दौंडला.

एका दिवसात शहरासह तालुक्यात 43 कोरोनाचे रुग्ण

बारामती ; वार्तापत्र
दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भाग पुन्हा एकदा कोरोनाने हादरला. कोरोनाने महाभयंकर रुद्रावतार धारण केला असून शहरात २२ तर दौंड ग्रामीण भागातील विविध गावात २१ असे एकुण ४३ नवे कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत.
जणू कोरोना ने दौंड मध्ये धोकादायक पातळी ओलांडली असून कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तालुका पुरता हादरला आहे. दौंड शहरात काल १०९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. १०९ पैकी २२ जणांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील विविध भागातील १९ तर राज्य राखीव दल क्रमांक ७ मधील ३ जवानांना कोरोना ची लागण झाली आहे. यामध्ये २० ते ७३ वयोगटातील १४ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे. अशी माहिती उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली.

तालुक्यातील विविध भागात २१ कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण नव्याने सापडले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक रासगे आणि यवत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी दिली. काल कासुर्डी येथील नवरा नवरीसह एकाच गावात १७ तर तालुक्यात ३० जण कोरोना बाधीत सापडले होते, आज पुन्हा तीच परिस्थिती कायम आहे. यवत येथील कोवीड सेंटर मधून कोरोना बाधीत व्यक्तिच्या संपर्कातील ८५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली, यामध्ये केडगाव येथील सहयाद्री पत्रा कंपनी मधील ८ कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. वरवंड येथे दोन, बोरीभडक (चंदनवाडी) येथे दोन, खुटबाव १,यवत १ व सहजपुर येथील हिल्टगाड कंपनी मधील ४ कामगार, कासुर्डी २, नांदुर १ असे एकूण २१ जण कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. यामध्ये कासुर्डी, सहजपुर व नांदुर या गावातील रूग्णांचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल आला आहे अशी माहिती डॉ रासगे यांनी दिली.

Related Articles

Back to top button