आता विना मोबाईल नेटवर्क आणी इंटरनेटशिवाय आत होणार पेमेंट,कसे ते जाणून घ्या
ग्राहकांना एसएमएस किंवा ईमेलद्वारे मिळणारा अलर्ट थोड्या उशिराने मिळेल.
आता विना मोबाईल नेटवर्क आणी इंटरनेटशिवाय आत होणार पेमेंट,कसे ते जाणून घ्या
ग्राहकांना एसएमएस किंवा ईमेलद्वारे मिळणारा अलर्ट थोड्या उशिराने मिळेल.
मुंबई,प्रतिनिधी
गावागावात आणि दूर्गम परिसरात डिजिटल ट्रान्झॅक्शनचा प्रसार करण्यासाठी खरे तर कोरोना काळानंतर लोकांनी याचा वापर करणे वाढले, जेणे करुन कुठेहे कोणाशीही संपर्क होऊ नये. तसेच ही खूप सोपी पद्धत देखील आहे, कारण यामुळे कुठेही सोबत पैसे घेऊन जावे लागत नाही.
या सगळ्यामुळे इंटरनेटचा वापरही वाढला. ज्यामुळे लोक आता त्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेट पॅक मारु लागले आहेत. परंतु जर तुम्ही एखाद्या व्यवहाराच्या मध्यभागी असाल आणि अचानक इंटरनेट काम करत नसेल तर? अशावेळी मात्र ही सोपी पद्धत आपल्याला महागात पडते.
रिझर्व्ह बँक सोमवारी ऑफलाइन डिजिटल पेमेंट्स बाबत एक रुपरेषा जारी केली आहे. ऑफलाइन पेमेंटअंतर्गत सध्या 200 रुपयांपर्यंत एक ट्रान्झॅक्शन करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त 10 ट्रान्झॅक्शन अर्थात एकूण 2000 रुपयांपर्यंतच्या ट्रान्झॅक्शनची मर्यादा असेल.
ऑफलाइन डिजिटल पेमेंट्सचा अर्थ असा की असे ट्रान्झॅक्शन ज्याकरता इंटरनेट किंवा मोबाइल नेटवर्कची आवश्यकता असणार नाही. ऑफलाइन पद्धतीचे पेमेंट समोरासमोर कार्ड, वॉलेट आणि मोबाइलसह कोणत्याही मार्गाने करता येऊ शकेल.
AFA ची आवश्यकता नाही
आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनसाठी ‘अॅडिशन फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन’ची आवश्यकता नाही. आरबीआयने असे म्हटले आहे की, यामध्ये पेमेंट ऑफलाइन होत असल्याने ग्राहकांना एसएमएस किंवा ईमेलद्वारे मिळणारा अलर्ट थोड्या उशिराने मिळेल.
ऑफलाइन पद्धतीने केल्या जाणाऱ्या या कमी मूल्याच्या डिजिटल पेमेंट सुविधेच्या रूपरेषेनुसार, ‘प्रत्येक व्यवहारासाठी 200 रुपयांची मर्यादा असेल. त्याची एकूण मर्यादा 2,000 रुपये असेल.’ मध्यवर्ती बँकेने सांगितले की, ऑफलाइन पेमेंट प्रायोगिक तत्त्वावर सप्टेंबर 2020 ते जून 2021 पर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये सुरू करण्यात आले होते. मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे हा आराखडा तयार करण्यात आला आहे.