शैक्षणिक

टेक्निकल हायस्कूलमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कोरोना मुळे गमावलेले मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली

टेक्निकल हायस्कूलमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

कोरोना मुळे गमावलेले मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली

बारामती वार्तापत्र

20 वीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावा बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन अग्रवाल टेक्निकल हायस्कूल सन 2002 (१० वी)बॅचच्या माजी विद्यार्थ्यां स्नेहमेळावा तब्बल २० वर्षानंतर कृषी विज्ञान केंद्र माळेगाव येथे दिनांक २७-०२-२०२२ रोजी पार पडला यावेळी तब्बल 75 विद्यार्थी उपस्थित होते.

सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला व बऱ्याच वर्षानंतर मित्र-मैत्रिणी भेटल्यानंतर गहिवरून आले व आपले आनंद अश्रूंना वाट मोकळी करून देत सर्वांनी आपली ओळख करून करत असलेले कामकाजाचे व कार्य क्षेत्राचा आढावा घेतला जेणेकरून भविष्यात एकमेकांना मदत करता येईल.

आपले पद प्रतिष्ठा कामाचा व्याप बाजूला ठेवून सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले होते सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता कार्यक्रमांमध्ये कोरोना मुळे गमावलेले मित्रांना श्रद्धांजली वाहण्यात आली भविष्यात आपल्या मित्रांना अडीअडचणीत मदत करण्याचा एकमेकांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार करण्यात आला या कार्यक्रमाचं संयोजन संदीप भोसले,मकरंद वारे,प्रमोद डिंबळे,शाहिद सय्यद,योगेश पाटील,शिल्पा दुरंदे,वर्षा भापकर, आरती मोरे यांनी केला सूत्रसंचालन संदीप भोसले यांनी केले तर आभार आरती भोरे यांनी मानले

Back to top button