“आदर्श केळी उत्पादन पद्धती व निर्यात” एक दिवसीय कार्यशाळा कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे संपन्न..
कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातून २९६ शेतकरी बांधव उपस्थित

“आदर्श केळी उत्पादन पद्धती व निर्यात” एक दिवसीय कार्यशाळा कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे संपन्न..
कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातून २९६ शेतकरी बांधव उपस्थित.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ एप्रिल २०२५ रोजी “आदर्श केळी
उत्पादन पद्धती व निर्यात” या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले होते.
या शेतकरी प्रशिक्षणास मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. के. बी. पाटील,केळी तज्ञ,जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव हे उपस्थित होते. त्यांनी
निर्यातक्षम केळी आदर्श व्यवस्थापन पद्धती, केळी पिकाचे काढणी पश्चात व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
श्री.कपिल जाचक, केळी रत्न यांनी केळी पिकाची लागवड, खत व पाणी व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि श्री.
किरण डोके, केळी निर्यातदार यांनी केळी निर्यात संदर्भात उपस्थित शेतकरी बांधवांना माहिती दिली. तसेच श्री संतोष करंजे यांनी केळी पिकासाठी
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादन खर्च कशाप्रकारे कमी करता येईल व उत्पन्न कसे वाढवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातून २९६ शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच श्री. श्रीधर काळे, प्रकल्प उपसंचालक आत्मा, पुणे व पुणे
जिल्ह्यातिल कृषी अधिकारी उपस्थित होते. डॉ. धीरज शिंदे, प्रमुख,के.व्ही.के बारामती यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व श्री यशवंत जगदाळे,विषय विशेषज्ञ – उद्यानविद्या यांनी सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.
–