स्थानिक

आदर्श नागरिक होणेसाठी शिक्षण महत्वाचे : डॉ.भाऊसाहेब कारेकर

जिद्द, चिकाटी आत्मविश्वास च्या जोरावर यश

आदर्श नागरिक होणेसाठी शिक्षण महत्वाचे : डॉ.भाऊसाहेब कारेकर

जिद्द, चिकाटी आत्मविश्वास च्या जोरावर यश

बारामती वार्तापत्र

भारताचे आदर्श नागरिक होऊन समाजसेवा व कुटूंब वत्सल राहणे साठी भारतीय शिक्षण व्यवस्था व शिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी केले.

लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यासाठी व विद्यार्थी संवाद करण्यासाठी डॉ कारेकर यांनी भेट दिली या प्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

या प्रसंगी बारामती विभागाचे गटशिक्षण अधिकारी निलेश गवळी व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मनोज जगताप , विज्ञान पर्यवेक्षक पुणे जिल्हा विराज खराटे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव लडकत सचिव गणेश लडकत, खजिनदार दत्तात्रय लडकत व संचालिका शुभांगी व प्रियंका लङकत , तानाजी गवळी व सतोष जाधव उपस्तीत होते.

जिद्द, चिकाटी आत्मविश्वास च्या जोरावर यश मिळवा, आई वडिलांचे, देशाचे व गुरुजनांचे नाव उज्जवल करून आदर्श नागरिक बना असाही सल्ला डॉ भाऊसाहेब कारेकर यांनी दिला.
विद्यालयामध्ये घेतले जाणारे विविध उपक्रम तसेच पहिली ते बारावीपर्यंत घेतल्या जाणाऱ्या फाउंडेशन कोर्सची विशेष तयारी करून घेण्याची पद्धत, लडकत स्कूलमध्ये पार पडलेल्या तालुकास्तरीय निबंध, कला व वक्तृत्व गायन स्पर्धे ची माहिती, विद्यालयात शिक्षकांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती, शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हाने, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकासा साठी शिक्षकांचे अमूल्य योगदान असते याबद्दल शिक्षकाशी संवाद साधला व विद्यालयामध्ये उपलब्ध असलेले सायन्स व कॉम्प्युटर लॅब व तसेच प्रशस्त सांस्कृतिक हॉल पाहणी, शिक्षण विषयक पॉलिसी बदल चर्चा केली.आभार सचिव गणेश लडकत यांनी मानले.

Back to top button