
बारामतीत एका रात्रीत पाच दुकाने फोडली
22000 रुपयांसह चोरट्यांनी आईस्क्रीम वर मारला डल्ला.
बारामती वार्तापत्र
रात्री बारामतीत सुखशांती अपार्टमेंट मधील पाच दुकाने चोरटयांनी फोडून वेगवेगळ्या दुकानातील 21200 रुपयांचा ऐवज चोरी करून एका आईस्क्रीमच्या दुकानातील आईस्क्रीम वर डल्ला मारला.
बारामतीतील शिवाजी चौक येथील सुखशांती अपार्टमेंटमधील रंगाचे, चपलांचे, डिझाईनिंग व इलेक्ट्रॉनिक्स व आइस्क्रीम पार्लर ही दुकाने रात्री दोन वाजेपासून चार वाजेपर्यंत फोडून त्यामधील रोख रक्कम21200 चोरट्यांनी चोरून नेली. तसेच आईस्क्रीम पार्लर च्या दुकानांमध्ये चोरटे आत शिरून त्यांनी फ्रिजमधील आईस्क्रीम चोरल्याचे दिसत आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असून, चोरटे पर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. या सर्व चोरी नाट्य मध्ये दोन चोरट्यांनी आईस्क्रीमच्या दुकानात जाऊन शटर उघडुन आईस्क्रीम वर ताव मारल्याने शहरात या विषयाची चर्चा सुरू झाली.
याविषयी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर दुकान मालकांनी बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केले असून पोलिसांनी अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
मात्र या घटनेवरून बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी आवाहन केल्याप्रमाणे चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरजच निर्माण झाली आहे. त्याविषयीही आता व्यवसायिकांनी सुद्धा पुढाकार घेणे गरजेचे आहे.