आधी जातिनिहाय जनगणना करा नंतरच राजकीय आरक्षण रद्द करा
याविरोधात समस्त ओबीसी लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल.

आधी जातिनिहाय जनगणना करा नंतरच राजकीय आरक्षण रद्द करा
याविरोधात समस्त ओबीसी लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल.
निलेश भोंग ;- बारामती वार्तापत्र
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी निमगाव येथील श्री संत सावतामाळी मंदिरात सर्वपक्षीय बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द आले असून समाजावर अन्याय झाला आहे हे आरक्षण पूर्ववत करून ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी लवकरच राज्यभर आंदोलन करणार असल्याचे सावता परिषदेचे मुख्य संघटक संतोष राजगुरू यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ॲड कृष्णाजी यादव म्हणाले की 1931 नंतर ओबीसी समाजाचे जातीनिहाय जनगणना झाली नसून प्रत्येक समाजाची जातीनिहाय जनगणना झालेली असून ओबीसी समाजावर अन्याय का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. याविरोधात समस्त ओबीसी लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल.
यावेळी पंचायत समितीचे मा. उपसभापती देवराज जाधव, दशरथ डोंगरे, वसंत मोहोळकर, माऊली बनकर, मच्छिंद्र चांदणे, मोहन दुधाळ, बापुराव शेंडे, अमर बोराटे, दत्तात्रय शेंडे, भारत शिंदे, अनिल राऊत, सौरभ शिंदे, बाबासाहेब भोंग, नामदेव शिंदे, तुषार खराडे, राजू भोंग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक राहुल जाधव यांनी केले तर आभार तात्यासाहेब वडापुरे यांनी मानले.