आपल्या दादांना झापूक झुपूक होऊन मतदान करा; बारामती सभेत सूरज चव्हाणचं भाषण
९ महिन्यात सूरजचं घर तयार होणार
आपल्या दादांना झापूक झुपूक होऊन मतदान करा; बारामती सभेत सूरज चव्हाणचं भाषण
९ महिन्यात सूरजचं घर तयार होणार
बारामती वार्तापत्र
बारामती मतदारसंघातून आज ( २८ ऑक्टोबर ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी कण्हेरी येथून प्रचाराचा शुभारंभ झाला. जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांनी अर्ज दाखल केला.
त्यानंतर प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने खास उपस्थिती लावली होती. एवढंच नव्हे तर त्याने भाषण करत अजित पवारांना मतं देण्यासाठी जनतेला आवाहन केलं.
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाणची खास भेट घेतली होती. त्याला शाबासकीची थाप देऊन अजित पवारांनी कौतुक केलं होतं. यावेळी अजित पवारांनी सूरजला त्याच्या गावात चांगलं घर बांधून देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. नुकताच सूरजच्या गावातल्या नव्या घराचा भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी सूरजने अजित पवारांचे आभार व्यक्त केले होते. त्यानंतर आज ( २८ ऑक्टोबर ) सूरज तोंड लपवत अजित पवारांच्या बारामती सभेत उपस्थित राहिला.
अजित पवारांच्या सभेत सूरज चव्हाण आल्याचं समजाताच जनता ओरडू लागली. त्यानंतर अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सूरजचं स्वागत केलं. पुढे सूरज एका मिनिटांचं भाषण करत हात जोडून म्हणाला, “नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण. आई मरिमाता…ओम नमः शिवाय…शिव शंभो…हर हर महादेव…गणपती बाप्पा मोरया…माझं स्वप्न दादांनी पूर्ण केलंय आणि गरिबांना दादांनी मदत केली. तर मनापासून दादांचे आभार मानतो. आपल्या दादांना झापूक झुपूक होऊन मतदान करा.”
दरम्यान, माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेनंतर येत्या ९ महिन्यात सूरजचं घर तयार होणार आहे. दोन बेडरूम, हॉल, किचन आणि बाहेरचा मोठा वऱ्हांडा असं सूरजच्या घराचं स्वरुप आहे. २००० स्केवअर फुटामध्ये सूरजच घर बांधलं जाणार आहे. यामध्ये एक मास्टर बेडरुम आणि पार्किंगसाठीही व्यवस्था केली जाणार आहे.