“आपसातील वाद मिटविण्यासाठी घटनाबाह्य पध्दत बंद व्हायला पाहिजे”
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला
“आपसातील वाद मिटविण्यासाठी घटनाबाह्य पध्दत बंद व्हायला पाहिजे”
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला
इसलामपूर ;इकबाल पीरज़ादे
वकीलांनी चाकोरीबाह्य क्षेत्रावर लक्ष द्यायला हवे. शेतीसंबंधी, बियाणे, पुनर्वसनाचे कायदे अभ्यासून त्यामधे काम करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. आजकाल वाढलेल्या ऑनलाईन व्यवहारात लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आहे. त्याबाबतीत स्थानिक न्यायालयात दाद मागता येते. असे मत प्रख्यात विधिज्ञ ॲड.डाॅ. उदय वारूंजीकर यांनी व्यक्त केले. इस्लामपूर वकील संघटनेतर्फे त्यांचे कायदेविषयक व्याख्यान झाले. ” वकीलांच्या समोरील नवीन संधी” हा व्याख्यानाचा विषय होता.
ॲड. वारूंजीकर म्हणाले कायदेविषयक रोज नवीन वाचन करायला पाहिजे. कायदा आणि समाज यामध्ये वकील हा महत्त्वपूर्ण दुवा आहे. वकीलीमध्ये सचोटीने व्यवसाय केल्यास यश हमखास मिळते.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा देताना म्हणाले चांगला उपक्रम इस्लामपूर बार तर्फे सुरू आहे. नवोदित वकीलाना यांचा मोठा ऊपयोग होऊ शकतो. पहिल्याच व्याख्यानास ॲड. वारूंजीकर यांच्यासारखे प्रतिभावान वक्ते लाभले आहेत.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला. यावेळेस ॲड. बी. डी. पाटील, अध्यक्ष प्रमोद जाधव, एच. एस. पवार, ऐ.एस. मोहिते, जे. एस. पाटील, शुभांगी पाटील, संतोषकुमार जाधव, सतीश पाटील, बाळासाहेब गायकवाड, आर. एम. पाटील, डी. एच. पाटील, इरफान मुल्ला, वाय. जे. मुल्ला, राहुल माळी, सुयोग पाटील, मिनहाज मिर्झा, शरद हुसेन पाटील, सुनिल कदम, विवेक बोंगाळे, मनोज पाटील यांनी संयोजन केले. स्वागत व प्रास्ताविक ॲड. संदीप पाटील यांनी केले. आभार ॲड. अमोल मदने यांनी मानले.