आमदार यशवंत माने यांनी हिप्परगे तलावाच्या पंप हाऊस पाणीपुरवठा योजनेची केली पाहणी.
निधी उपलब्ध करून प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन.
आमदार यशवंत माने यांनी हिप्परगे तलावाच्या पंप हाऊस पाणीपुरवठा योजनेची केली पाहणी.
निधी उपलब्ध करून प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन.
बारामती वार्तापत्र
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील व सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगे तलावात उजनी धरणातून दोन पंपहाउस व्दारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून रविवार(दि १३)रोजी मोहोळ चे आमदार यशवंत माने व जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी भेट देवून पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व उर्वरित पंपहाउस सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या शी चर्चा करून निधी उपलब्ध करून प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे ही यावेळी आ.यशवंत तात्या माने यांनी सांगितले.
याप्रसंगी उ सोलापूर तालुकाध्यक्ष प्रल्हाद मामा काशिद,उपसभापती जितेंद्र शीलवंत,मनोज साठे,हरिभाऊ घाडगे,युवा नेते जयदीप साठे,कार्यकारी अभियंता रमेश वाडकर,डेपोटी इंजिनिर वसुंधरा दासरी मॅडम,चेतन राठोड सह बाळासाहेब भिंगारे, अतिश बचुटे, अमोल शिंदे, विनायक खराडे, अक्षय बचुटे, स्वप्नील वायचले, बालाजी शिंदे,संतोष बरबोले ,सागर काळे उपस्थित होते.