कोरोंना विशेष

खुशखबर ! कोरोना ची लस आली बारामतीत

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचणार

खुशखबर ! कोरोना ची लस आली बारामतीत

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचणार

बारामती वार्तापत्र
ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होता. आपल्या तालुक्यात लस केव्हा येईल याच्या चर्चा गाव पातळी, गल्लीपर्यंत चालू होत्या ती प्रतीक्षा आता संपली असून बारामतीत शनिवारपासून लस उपलब्ध होणार आहे.

पहिल्या टप्प्यात शासकीय आरोग्य कर्मचारी ,खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी थेट रुग्णांची सेवेच्या रुपाने संपर्कात येत, आपली कामगिरी बजावली होती हीलस कोरोणा योद्धा असलेल्या,आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरुवातीला देण्यात येणार आहे.

यासाठी तालुक्यातील 1278 शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच तालुक्यातील खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील 2200 आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.या कर्मचाऱ्यांनी कोविड ॲपवर लसीकरणासाठी आपले नाव नोंदणी केले होते .त्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

यासाठी पाच पथके तयार करण्यात आली असून यामध्ये 1 व्हॅक्सिनेटर (लस देणारा ) तर 4 सहकारी सेवक अशी पथके तयार करण्यात आली आहेत.या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पुणे येथे देण्यात आले आहे.

एका दिवसात 300 ते 400 कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवसात लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button