स्थानिक

आय पी एस अभिजित चौधर चा सुप्रिया सुळे कडून सत्कार

खेचून आणणे हे तरुण पिढीसाठी आदर्शवत

आय पी एस अभिजित चौधर चा सुप्रिया सुळे कडून सत्कार

खेचून आणणे हे तरुण पिढीसाठी आदर्शवत

बारामती वार्तापत्र 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस पदी निवड झालेले रुई येथील अभिजीत रामदास चौधर यांचा सत्कार बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवार ०६मे रोजी रुई येथील निवासस्थानी भेट देऊन सत्कार केला.

या प्रसंगी वडील, रामदास चौधर आई अनुराधा चौधर ,पत्नी अश्विनी चौधर व बहीण डॉ.तृप्ती दराडे आणि अभिजीत चौधर, सागर चौधर, साईनाथ चौधर,माऊली चौधर, विनोद करपे, विकास शिरसठ,अनिकेत चौधर आदी उपस्तीत होते.

सर्वसामान्य परिस्थिती व शेतकरी कुटुंबातील असताना सुद्धा जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर सहा वेळा परीक्षा देत शेवटी यश खेचून आणणे हे तरुण पिढीसाठी आदर्शवत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामती करांनी केलेला सन्मान नेहमी स्मृतिदायक व स्फूर्ती दायक राहील असे अभिजित चौधर यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button