आरक्षणाच्या मुद्यावर धनगर समाज आक्रमक, इंदापुरात रास्ता रोको आंदोलन
दीपक बोऱ्हाडे यांचे सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू

आरक्षणाच्या मुद्यावर धनगर समाज आक्रमक, इंदापुरात रास्ता रोको आंदोलन
दीपक बोऱ्हाडे यांचे सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू
इंदापूर,आदित्य बोराटे –
इंदापूर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासननिर्णय काढण्याच्या अनुषंगाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित मिळावे. याकरिता जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नियोजित स्मारक स्थळी दीपक बोऱ्हाडे यांनी सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून इंदापुरातील सकल धनगर समाजाच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लवकरात लवकर कार्यवाही करून याबाबत शासन निर्णय जारी करावा. धनगर जमातीच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने आवश्यक निर्णय घेऊन न्याय देण्यात यावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शहरातील पंचायत समिती समोरील जुना पुणे – सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करत असे निवेदन प्रशासकीय अधिकारी अशोक पोळ यांना देण्यात आले आहे.आंदोलनावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोपट पवार,आप्पासाहेब माने,लक्षण देवकाते,अनिताताई खरात,किरण गोफणे,प्रवीण हरणावळ,ॲड आकाश पवार,संजय शिंदे, संजय शिंदे,प्रदीप वाघमोडे,सचिन तरंगे,बापू पारेकर,प्रदीप तरंगे,दादा मारकड,सतीश वाघमोडे,अतुल शिंगाडे,दिलीप भिसे आदी समाज बांधव उपस्थित होते.