आरोग्यम योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न
“औषधांवर अवलंबून न राहता निसर्गाशी सुसंगत जीवन जगणे हीच खरी आरोग्यसंपदा आहे,”

आरोग्यम योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न
“औषधांवर अवलंबून न राहता निसर्गाशी सुसंगत जीवन जगणे हीच खरी आरोग्यसंपदा आहे,”
इंदापूर;प्रतिनिधि
इंदापूर: इंदापूर बेडसिंग रोड येथील आरोग्यम योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर केंद्राचे रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 11.30 वाजता भव्य उद्घाटन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्यास गुरुवर्य ह. भ. प. बंडातात्या कराडकर महाराज, कृषिमंत्री मा. श्री. दत्तामामा भरणे यांच्या सुविद्य पत्नी सौ. सारिका मामी भरणे, मधुकर मामा भरणे व उद्योजक भरतशेठ शहा यांची विशेष उपस्थिती लाभली.
योग रत्न योगाचार्य श्री. विजय नवल पाटील व डॉ. सुवर्णा नवल पाटील केंद्र संचालिका ह्या संचालन करणार असून याप्रसंगी “शरीर निरोगी राहण्यासाठी दिनचर्या, आहारचर्या, ऋतुचर्या आयुर्वेदाच्या नियमांचे पालन करून शरीर निरोगी ठेवले पाहिजे आणि गलांडवाडी न 1, व न 2 गावात असे चार केंद्र सुरू आहे याचा सार्थ अभिमान आहे, योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर व आयुर्वेदाचा सर्वांनी फायदा घ्यावा” असे ज्येष्ठ कीर्तनकार ह भ प बंडातात्या कराडकर म्हणाले.
“योग, निसर्गोपचार ॲक्युपंक्चर आयुर्वेद, या माध्यमातून औषधमुक्त जीवन व नैसर्गिक आरोग्याची नवी दिशा समाजाला देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि तो होईल” असा विश्वास सौ. सारिका मामी भरणे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
विविध संघटनांचा सहभाग
कार्यक्रमास इंदापूर तालुक्यातील अनेक संघटनांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
त्यामध्ये –इंदापूर तालुक्यातील
व्यसनमुक्त युवक संघ, आर्ट ऑफ लिविंग, युवा क्रांती प्रतिष्ठान, पतंजली योग समिती, वृक्ष संजीवनी परिवार, ज्येष्ठ नागरिक संघ, इंदापूर सायकल क्लब, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, जय हिंद आजी-माजी सैनिक संघ, व्यापारी संघटना, पत्रकार संघ इंदापूर तालुका यांचा समावेश होता.
तसेच आजी-माजी सरपंच-उपसरपंच, सोसायटी चेअरमन, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ गलांडवाडी नं. २ आणि विठ्ठलवाडी, विद्या प्रतिष्ठानचे शिक्षकवर्ग व ज्येष्ठ नागरिक यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
या केंद्राच्या माध्यमातून समाजातील योग, ध्यान, निसर्गोपचार व ॲक्युपंक्चरचे विविध उपक्रम राबवून आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार केला जाईल.
“औषधांवर अवलंबून न राहता निसर्गाशी सुसंगत जीवन जगणे हीच खरी आरोग्यसंपदा आहे,”
असा विश्वास उद्घाटन समारंभात योगाचार्य विजय नवल पाटील यांनी व्यक्त केला व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष नरुटे व विजयकुमार फलफले सर यांनी केले.
शेवटी प्रा. धनंजय देशमुख यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.