कोरोंना विशेष

आरोग्य सेवकांना त्यांचा परतावा त्वरित द्या – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

बैठकीत आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील

आरोग्य सेवकांना त्यांचा परतावा त्वरित द्या – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

बैठकीत आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील

बारामती वार्तापत्र

कोरोना महामारी च्या काळात ज्यांनी आपल्या कुटुंबाचाही विचार केला नाही. आपल्या सर्व ताकदीनिशी रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या आरोग्य सेवक, अधीकारी, कर्मचारी ,आशा यांचा परतावा त्यांना त्वरित द्यावा असे निर्देश अजित दादा पवार यांनी दिले.

काल अजितदादांच्या अध्यक्षतेखालील कोरोना व पर्यटन विकास यावर आढावा बैठक झाली. या बैठकीत आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील, आरोग्य विभागाने पदांच्या मागणीचे नियोजन करावे ,ऑक्सिजनचा नवीन प्रकल्प सुरू झाल्यामुळे आता त्याची टंचाई भासणार नाही. असे त्यांनी सांगितले. धोंडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम लवकर सुरू करावे तसेच शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात नाशिक येथे विशेष मोहीम राबवून पोलिसांनी सहकार्य केले. त्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितरीत्या राबवावी असा सल्लाही त्यांनी दिला.

जिल्ह्यात लसीकरणासाठी तीस हजार वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह तेरा हजार लिटर लस साठवणुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. शंभर दिवसात लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होईल असे नियोजन करण्यात आल्‍याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.

Back to top button