इंदापूर

संक्रांतीच्या मुहूर्तावर इंदापूरच्या बाजारापेठत चुड्या-पाटल्या व खण घेण्यास गर्दी

इंधन दरवाढीचा व्यापाऱ्यांना फटका

संक्रांतीच्या मुहूर्तावर इंदापूरच्या बाजारापेठत चुड्या-पाटल्या व खण घेण्यास गर्दी

इंधन दरवाढीचा व्यापाऱ्यांना फटका

इंदापूर : प्रतिनिधी
मकर संक्रांतीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.त्या निमित्ताने खरेदीसाठी इंदापूरची बाजारपेठ फुलली असून सण साजरा करण्यासाठी लागणाऱ्या चुड्या-पाटल्या व खण घेण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे.

मकर संक्रांतीला परंपरेनुसार चुड्या-पाटल्या खण ( मडके ) यांचे अनन्य साधारण महत्व आहे.त्यामुळे ते खरेदीसाठी महिलांची गर्दी आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीही बाजार भाव स्थिर असून आळंद १०० ते १२० रुपये,लोटक ६० ते ७०, सुगड ३० ते ४० आणि बोळकं हे २० ते ३० रुपयांना विकलं जात असल्याची माहिती मंजू संतोष कुंभार (रा.शहा,महादेवनगर,ता.इंदापूर) यांनी दिली.

गतवर्षीच्या तुलनेत बाजारभावात कोणत्याही प्रकारचा चढउतार दिसून येत नाही.पाटल्या जोडी १० ते २० व लाखी चुड्यांचा दर १० रुपये असा आहे.परंतु इंधन दरवाढीचा फटका व्यापाऱ्यांना बसला असल्याचे चुड्या-पाटल्याचे किरकोळ व्यापारी ओंकार जंगम (राहणार,निमगाव केतकी) यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!