इंदापूर शहरातील विकास कामांकरिता १० कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती

इंदापूर शहरातील विकास कामांकरिता १० कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील रस्ते, ड्रेनेज,सुशोभीकरण तसेच विविध विकासकामांकरिता दलित वस्ती,दलित्तेतर व नगरोत्थान निधीअंतर्गत सुमारे १० कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, साठेनगर व लोकमान्य नगर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कॉंक्रीट रस्त्यांकरिता २ कोटी १० लाख निधी व नागरी दलित्तेतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत डॉ. आंबेडकर नगर,साठेनगर व लोकमान्य नगर येथे अंडरग्राउंड ड्रेनेज करिता ६८ लाख ९९ हजार तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील बावडा वेस येथील संत सावतामाळी मंदिरासमोर समाज मंदिर बांधणे या कामाकरिता १ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच इंदापूर शहरातील विविध ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत एकूण ४१ कामांकरिता ६ कोटी ६२ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे इंदापूर शहरातील बऱ्याच काळ प्रलंबित असणाऱ्या रस्त्यांची तसेच ड्रेनेजची तसेच सुशोभीकरणाची कामे अत्यंत गतीने होणार असून शहराच्या विकासात अधिकची भर पडणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.