आ.रोहित पवारांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित दादांना लिहिले पत्र
कमल संधीची अट रद्द करण्याची मागणी
आ.रोहित पवारांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित दादांना लिहिले पत्र
कमल संधीची अट रद्द करण्याची मागणी
बारामती वार्तापत्र
राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता आमदार रोहित पवार यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना पत्र पाठवून कमाल संधीची अट रद्द करण्याची मागणी केलेले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक 30 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या घोषणेनुसार स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल सहा संधीची अट घातली आहे. तर एसटी ,एस सी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कुठलीही अट नसणार आहे व उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल नऊ संधी उपलब्ध असणार आहेत.
लोकसेवा आयोग उमेदवारांना वयाची अट घालते त्यामुळे संधीची अट घालण्याची आवश्यकता नाही. तसेच संधीची अट घातल्याने साध्य होण्यासारखे काहीही नाही. उलट कमाल संधीची अट घातल्याने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे ही अट तात्काळ मागे घ्यावी.
एमपीएससीने 4 जानेवारी 19 रोजी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग चा दावा केलेल्या उमेदवारांनी खुला अथवा दुर्बल घटक या प्रवर्गा पैकी कुठल्याही एक प्रवर्ग निवडण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी 5 जानेवारी ते 15 जानेवारी 2O21 पर्यंतचा कालावधी दिलेला आहे. या नियमानुसार ज्या उमेदवारांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक हा प्रवर्ग निवडल्यास नंतरच्या काळात संबंधित उमेदवारांना मागास प्रवर्ग चा लाभ घेता येणार नसल्याचेही त्यांनी पत्रात लिहिले आहे.
तसेच मराठा आरक्षण संदर्भातील विषयही सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे .घटना पीठासमोर येत्या 25 जानेवारीपासून नियमितपणे या विषयाची सुनावणी घटना पीठासमोर होणार आहे. त्यामुळे या परिपत्रकामुळे मराठा समाजातील उमेदवारांची गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे सद्यस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या वतीने काढण्यात आलेले परिपत्रक तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणीही आमदार रोहित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्रातून केले आहे.